छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): दुष्काळी परिस्थितीच्या
पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शनिवारी बीड बायपास रोडवरील बाळापूर येथील गावातील पाणीटंचाई, टँकरद्वारे सुरू असलेला पाणीपुरवठा तसेच जनावरांसाठी चारा उपलब्धता व चारा छावण्यांच्या अनुषंगाने पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील माहिती जाणून घेतली. दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा तसेच पशुधनासाठी चारा उपलब्धतेच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणेकडून माहिती घेतली. यावेळी ग्रामसेवक सचिन पाटील यांनी गावातील जलजीवन मिशन योजना, चारा छावणी तसेच पाणी टंचाई आदींबाबत जिल्हाधिकारी गौडा यांना माहिती देत दुष्काळाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांसह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांची जिल्हाधिकारी गौडा यांनी नोंद करुन घेत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सुविधा देण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions














